आरोग्य

रक्तचंदन म्हणजे नेमकं काय?, नक्की काय आहेत त्याचे फायदे; वाचा सविस्तर!

रक्तचंदनाच्या झाडाच्या बहुपयोगी गुणधर्मामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते व ते बऱ्याच महाग किमतीमध्ये विकलं जातं. आपण चंदन तस्करी, चंदन चोरीला, एका रात्रीत चंदनाची झाडे गेलीत चोरीला, अशा घटना आपण ऐकल्या असतील. पण कशामुळ नक्की चंदनाला इतकी मागणी परत चंदनामध्ये रक्तचंदन नक्की काय आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

बाजारात बऱ्याच वेळा रक्तचंदनाच्याऐवजी अन्य झाडांची खोड विकली जातात. त्यामुळे ते आळखायची कसं तेही आपण जाणून घेणार आहोत. चंदनाच्या संपूर्ण जगभरात एकूण पंधरा प्रजाती आढळून येतात यांपैकी एक म्हणजे रक्तचंदन होय. रक्तचंदनामध्ये चंदनाच्या अन्य प्रजाती प्रमाणेच अनेक औषधी गुणधर्म असतात.

रक्त चांदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला ‘रक्त चंदन’ असं म्हटलं आहे. चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चांदनाप्रमाणे रक्त चांदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही. रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो.

चंदनाच्या झाडाची वाढ झपाट्याने होते. तीन वर्षांमध्ये रक्त चंदनाच्या झाडाची वाढ ही साधारण पाच मीटर इतकी होते.रक्त चंदनाच्या झाडाची साल खडबडीत असते तर खोड अत्यंत सरळ असते. या झाडाच्या पानांचा आकार छोटा असतो.

साधारण लाकूड पाण्यात तरंगते पण याच्या उलट रक्त चंदनाचे लाकूड जास्त घनतेमुळे पाण्यामध्ये टाकले असता अजिबात तरंगत नसल्याने हे लाकूड ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगितला जातो.

झाडाला सुंगध नसला तरीही या झाडाचे लाकूड मात्र फारच उपयोगी असते. किमती फर्निचर बविण्यासाठी या लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे या लाकडाला चीन, जपान, सिंगापूर देशात भरपूर मागणी असते. आंध्रप्रदेश राज्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने आढळते. या झाडाला भरपूर मागणी असल्याने या झाडांची लागवड करून भरपूर नफा कमावण्यासाठीचा व्यवसाय वाढीस लागला आहे.

Bhopal News In Hindi : MP STSF confiscates rare blood sandal of 8 ...

रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते.

 

दरम्यान, महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात , पुसद तालुक्यातील पंजाबराव शिंदे यांच्या शेतातील रक्त चंदनाच्या झाडाची बातमी कळली. या पूर्वापार जपलेल्या झाडापासून त्यांना करोडो रुपयांचा फायदा होणार असल्याचे सांगितले आहे.

बाबा की पतंजली चीन भेज रही थी 50 हजार ...

Comment here