ट्रेंडिंग

छोटी बहिण दुधासारखी दिसते म्हणून शिल्पा शेट्टी जळायची, बहिणीला द्यायची भयानक त्रास!

बाॅलिवूडची चंदेरी दुनिया सर्वांनाच आवडत असावी. फ्लॅशचा छगमगाट, अवाॅर्ड शो, जगभर प्रवास आणि चाहत्यांकडून कलाकारांना मिळणार प्रेम पाहून आपण हबकून जातो. अन मनात कुठेतरी चित्रपटात काम करण्याची सुप्त इच्छा जागी होते.

बाॅलिवूडची राणी शिल्पा शेट्टी एक हरहुन्नरी कलाकार मानली जाते. शिल्पा बहुगुणी कलाकार आहेच पण सोबत ती योगा व फिटनेस मध्ये बरीच पारंगत आहे. चित्रपट पडद्यापासून लांब असली तरी शिल्पा आयुष्यातील किस्से सांगून चांगलीच चर्चेत येत असते.

शिल्पा शेट्टीने नुकतीच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला की, छोटी बहिण आणि अभिनेत्री शमिता शेट्टीवर शिल्पा खूपच जळायची. कारण ती तिच्यापेक्षा दिसायला खूपच सुंदर होती.

शमिता सुंदर होती तर माझा रंग सावळा होता. तेव्हा मी तिच्यावर खूपच जळायचे. मी बऱ्याचदा माझ्या आईला विचारले कि तू तिला इतके सुंदर का बनवलेस आणि मला काळे बनवलेस. शिल्पाच्या आईला मात्र आपल्या मुलीला कस समजाव हे समजत नसे.

शिल्पा आपल्या बहिणीला फारच त्रास देत असे. शमिता रात्री झोपायची तेव्हा शिल्पा तीची वेणी कापून टाकत असे, अस केल्यावर छोटी शमिता खूपच रडायची. शिल्पाने सांगितले कि जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी आमच्यामध्ये खूप भांडणे होत होती. एकदा मी शमिताला वडिलांच्या कपाटामध्ये बंद केले होते.

इतकंच नव्हे तर शिल्पा लहानपणी खूप भांडखोर होती. एकदा तर तिने शमिताला दगड देखील मारला होता ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर जखम झाली होती. शिल्पा हा सगळा प्रकार फक्त तिची बहिण सुंदर असल्यामुळे करत असे.

शमिताने जेव्हा मोहब्बते चित्रपटातून काम केल. तेव्हा शिल्पाला फारच त्रास झाला होता. शमिता दिसायला फारच सुंदर होती. तसंच शमिता अभिनयासह डान्समध्येही सरस होती. यामुळे आपल्याला कदाचित चित्रपटात कामाची संधी भेटणार नाही.

अस असल तरी शमिता आणि शिल्पा या बहिणींच नात आता चांगलच घट्ट झाल आहे. 2000 साली प्रदर्शित झालेल्या मोहब्बते या चित्रपटातून शमिताने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. शमिता आजतागायत अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

शमिता ही सुरूवातीला फॅशन डिझाईनिंग क्षेत्रातील दर्जेदार नाव होतं. ‘यो क्या हुआ ब्रो’ या वेबसिरीजमध्ये शमिता आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे.

Comment here