आरोग्य

दात पिवळे पडलेत?, पिवळेपणा घालवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

आपले दात जर पिवळे पडले असतील तर आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. दात पिवळे असतील तर आपलं बॅड ईम्प्रेशन पडतं. महाविद्यालय असो किंवा ऑफिसमध्ये असो आपल्या पिवळ्या दातांमुळे आपली अनेकदा खेचतात. यावर आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

Why do teeth go yellow? - BBC Science Focus Magazine

दाताचा पिवळेपणा घालवण्यासाठी रात्री जेवण झाल्यानंतर पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते पाणी तोंडात धरून त्याच्या त्याची चुळ भरावी. असं केल्याने पिवळे पडलेले दात पांढरे होण्यास मदत होईल.

सकाळी आपण उठल्यावर ब्रश करतो त्याप्रमाणे रात्री जेवण झालं की कॉलगेट न घेता तोंडात पाणी घेऊन चुळा भराव्यात.

स्ट्राॅबेरी घेऊन त्या कुस्काराव्यात आणि त्याची पेस्ट करून त्याने आपले दात घासावेत. ती पेस्ट लावताना हलक्या हाताने आपल्या दातांची आपल्या दाताला लावावी. या उपायानेसुद्धा दाताचा पिवळेपणा कमी होम्यास मदत होते.

Yellow Teeth of a Man Stock Footage Video (100% Royalty-free ...

कडूलिंबाची काही पाने घेऊन ती सावलीत सुकवावीत. त्यानंतर ती सुकलेली पाने घेऊन ती मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावीत. या पेस्टचा वापर करताना ही पेस्ट दिवसातून 2 वेळा दातावर लावा.

दातांच्या बाजूला जर पिवळा थर साचला असेल तर ते थर खूपच खराब दिसतो. कारण या थरामुळे आपला चेहराही विद्रुप दिसतो. हा थर घालवण्यासाठी अननस या फळाचा वापर करून त्या अननसातील एक तुकडा घेऊन तो आपल्या दातांवर चोळावा. यामुळे तो पिवळा थर कमी होण्यास मदत होतील.

बेकिंग सोडा आणि लिंबाचे मिश्रण करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन नेहमीप्रमाणे दात घासा. तीन मिनिटांत तुमचे दात मोत्यासारखे चमकदार होतील.

Tooth Fairy giving out $3.70 per lost tooth on average | WJLA

काहीजण दिवसभर मोठ्या प्रमाणात स्मोकिंग, वेवगवेगळे खाद्यपदार्थ खातात. विविध सवयींचा परिणाम दातांवर होत असतो. अनेकदा खाल्ल्यानंतर पदार्थ दातात अडकतात ते वेळीच साफ केले नाहीत तर दात खराब होऊ शकतात. त्यामुळे दिवसभरात अनेकवेळा आपण चूळ भरावी.

दिवसभरात काळे मनुके चघळावेत कारण मनुक्यांमधून बाहेर पडणारे अ‌ॅसिडिक गुणधर्म दातावारील पिवळेपणा कमी करण्यास मदत करतात.

Permanent teeth - Wikipedia

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहेत. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

Comment here