आरोग्य

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा हे सोपे 10 उपाय; वाचा सविस्तर!

आपलं व्यक्तिमत्व दर्जेदार आणि उत्तम असण्यासाठी आपली स्मरणशक्ती उत्तम असणं गरजेचं आहे. काहींची स्मरणशक्ती ही इतकी उत्तम म्हणण्यापेक्षी चलाक नसते. मित्रांनो खचून जाऊ नका कारण आपण आपली स्मरणशक्ती वाढवू शकतो. कशाप्रकारे ती वाढवायची हे आपण जाणून घेणार आहोत.

 दररोज अक्रोडचे सेवन करा.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बाजारात विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु या औषधांचे सेवन करण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता.

जेवण करण्याअगोदर रोज एक सफरचंद खावावं. फक्त ते सफरचंद खाताना सालीसकट खावावं. कारण बहूतेकांना खाताना फळांची साल काढण्याची सवय असते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा उपाय महत्वाचा आहे.

नेहमी जेवणाआधी सफरचंद साल न काढता सेवन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.

दररोज एक अक्रोड खावावं. अक्रोडात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन-ई असते. व्हिटामिन-ई आपली स्मरणशक्ती वेगाने वाढवण्यास मदत करते.

आपण आवळा खाल्ला असेलच. आवळा आपल्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात गुणकारी आहे. बाजारात आवळ्याचं खूप पदार्थ बनतात. त्यातील आपण घरच्या घरी आवळ्याचा मुरांबा करावा आणि रोज एक आवळा व त्यासोबत त्यातील पाक खावावा.

नियमित गुलकंदाचे सेवन केल्यानेही बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात दोन चमचे मध टाकून ते पाणी प्यावं. यानेही आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

रोज रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर काही वेळाने पाण्यामध्ये उगाळलेलं वेखंड एकत्रित करून प्यावं. त्यासोबत सकाळी सुर्योद्यापुर्वी उठावं त्यानंतर कमीत कमी 1 तास तरी व्यायाम करावा.

व्यायाम करताना त्यामध्ये व्यायाम झाल्यानंतर शेवटी सुर्य नमस्कार खालावेत. जर काहीच व्यायाम केला नाही फक्त सुर्यनमस्कार घातले तरी ते फायद्याचं ठरणार आहे.

आपल्या आहारात दररोज हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. यानेही आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

रात्री झोपताना 4 ते 6 बदाम पाण्यात भिजवावेत. सकाळी व्यायाम झाला की ते बदाम खावेत. ते बदाम खाताना त्याची साल काढून टाकावी. बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजले की ते फुगतात. बदाम आपल्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत करतात.

रात्री बदाम पाण्यात भिजवून सकाळी साल काढून खा.

आठवड्यातून एकदा तरी बीटाचा रस प्यावा. कंदमुळामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याला फायद्याचे घटक असतात.

शेवटचा उपाय तास सर्वसामान्यांच्या खिशाला परडणारा नसला तरी तो खुप महत्वाचा आहे. एक चिमूटभर रेशम घ्यावं. माणसिक समस्या आणि निद्रानाश या गोष्टींमुळे मानवाची बुद्धी कमी चालते. मात्र केशरच्या सेवनाने या सर्व सामान्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते.

महत्त्वाची सूचना- www.bigmarathi.com या वेबसाईटवर सांगितलेले उपाय हे सर्वसाधारण माहितीवर अवलंबून आहेत. ते प्रत्येकाला लागू होतीलच, असं नाही. आरोग्यविषयक कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी. लेखात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.

Comment here