ट्रेंडिंगफॅशनलाईफस्टाईल

…म्हणून जगभरातील महिला फक्त ‘या’ माणसाच ऐकून सिगारेट ओढायला लागल्या!

मै जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुये मे उड़ाता चला गया
देवानंदच्या या ओळी जवळपास प्रत्येकाच्या तोंडी फीट झाल्या असतील.सिगारेट पिणं हा भारतात अजूनही श्रीमंतांच्या चैनीसाठी बनवलेल व्यसन मानलं जात.

सिगारेटचा इतिहासही फार जुना आहे. अगदी माया संस्कृतीत या सिगार पिण्याचे दाखले आपल्याला मिळू शकतील. भारतात अनेक पुरूष लोक या व्यसनात गुंग असतात. या पुरुषांनी सिगारेट ओढली तर त्याच आपल्याला अप्रुप वाटत नाही.

महिलांनी सिगारेट ओढली तर मात्र त्याचा अर्थ थेट चारित्र्याशी जोडला जाण्याचा प्रकार आपल्या समाजात घडतो. महिलांच कॅरेक्टर हे सिगारेट पिण्यावरून ठरवल जात. बाहेर देशात मात्र सिगारेट ओढण ही सर्वसाधारण बाब मानली जाते.

परदेशातील महिला अगदी रस्ताने जातानाही सिगारेट सहजपणे ओढताना दिसून येतात. पण या महिलांना सिगारेट ओढण्यासाठी प्रेरणा देणारा चक्क एक पुरूष होता. सिगारेट आणि महिलां संबंधीचा हा किस्सा वाचून तुम्ही नक्की अवाक व्हाल.

पहिल्या महायुद्धाच्या काळात सिगारेटच मोठ्या प्रमाणात सेवन केल जाऊ लागल. विशेष म्हणजे यादरम्यान रेशनच्या दुकानावर अन्नधान्यासोबत सिगारेटची पाकीट स्वस्तात मिळत असत.पहिल्या महायुद्धाच्या काळात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा पडला होता.

सिगारेट पिल्यावर माणसाला भूक लागत नसे. म्हणून हौस म्हणून नव्हे तर भूकेवरचा पर्याय म्हणून लोकांनी सिगार ओढायला सुरूवात केली. हळूहळू जनजीवन बदलत गेल्यावर चक्क सिगार पिणं हे चैनीच हादन बनल.

या काळातही महिला मात्र सिगारेट ओढत नसतं. अमेरिकेतील एका माणसाच्या करामतीने मात्र हे शक्य झाल. अन महिलांनी सिगारेट ओढायला सुरूवात केली. जाॅर्ज हिल अस या अवलियाचं नाव.

जाॅर्ज हिल हे अमेरिकेतील प्रसिद्ध तंबाखू कंपनीचे अध्यक्ष होते. जाॅर्ज यांचा हा व्यवसाय प्रचंड वाढला होता. मात्र महिलांनी सिगारेट ओढावी अस या जाॅर्जच म्हणणं होत. मात्र त्याच्या या कल्पनेने बराच विरोध झाला.

जाॅर्ज मात्र हार माननारा नव्हता. जॉर्ज यांनी तत्कालीन विश्वातील सर्वात मोठा मनोवैज्ञानिक सिग्मंड फ्राईडचा पुतण्या एडवर्ड बर्नेस याच्या मदतीने ३१ मार्च १९२९ रोजी एक कॅम्पेन राबवले.

महिलांना पुरूषांसोबत समानाधिकार मिळावा म्हणून या कॅम्पेनमध्ये जागरूकता करण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की महिलांनी सिगरेट पिण्याची गोष्टही समानतेशी जोडली. या क्षणापासून महिला अगदी बिनधास्त सिगारेट ओढताना दिसल्या.

Comment here